सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या इंजिनिअर तरुणांसाठी पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation – PMC) नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदांची रखडलेली भरती प्रक्रिया आता मार्गी लागली आहे.
भरतीचे महत्त्वाचे तपशील
- महामंडळ: पुणे महानगरपालिका (PMC)
- पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) – (स्थापत्य शाखा)
- एकूण पदे: १६९ (पदे वाढवण्यात आली आहेत)
- नोकरीचा प्रकार: सरकारी नोकरी
भरती प्रक्रियेतील मोठे बदल
जानेवारी २०२४ मध्ये ११३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, मात्र मराठा आरक्षण (SEBC) लागू झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता यामध्ये खालील महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:
- पदांची वाढ: पूर्वी ११३ पदांसाठी जाहिरात होती, ती वाढवून आता एकूण १६९ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
- आरक्षणाचा समावेश: या पदभरतीमध्ये मराठा आरक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
- परीक्षा घेणारी संस्था: ही सुधारित भरती आयबीपीएसद्वारे (IBPS) राबवण्यात येणार आहे.
- वयोमर्यादेत सवलत: ९ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला प्रतिसाद देणाऱ्या आणि आता वयोमर्यादा पार झालेल्या २७,८७९ उमेदवारांना राज्य शासनाने वयोमर्यादेत सवलत दिली आहे.
- अर्ज वैध: वयोमर्यादेत सवलत मिळाल्यामुळे या उमेदवारांचे अर्ज वैध धरले जाणार असून, त्यांना प्रवर्ग (Category) सुधारणा करण्याचीही संधी मिळणार आहे.
यापूर्वी महापालिकेने ४४८ आणि ३२० पदांची भरती पूर्ण केली होती, आणि आता ही कनिष्ठ अभियंत्यांसाठी तिसऱ्या टप्प्यातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया असेल.
अर्ज कसा करावा?
या भरतीसाठी लवकरच नवीन सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. सुधारित भरती प्रक्रिया आयबीपीएसद्वारे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येईल. नवीन जाहिरात आल्यानंतर पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळेल.
व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा