Ladki Bahin Yojna List: महाराष्ट्र राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच ‘लाडकी बहीण योजना’ लागू केली, जी राज्यात सुपरहीट ठरली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार, राज्यातील गरजू महिलांना दरमहा ₹२,१०० रुपये मिळणार आहेत. ही योजना विशेषत: घटस्फोटीत, विधवा, परित्यत्का, विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.
ही योजना ज्यावेळी सुरु झाली, त्यावेळी महिलांना ₹१,५०० रुपये दिले जात होते, मात्र आता महायुतीचं सरकार आल्यानंतर हे पैसे ₹२,१०० करण्यात आले आहेत. यामुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना महाराष्ट्रात राहणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू करण्यात आली आहे.
तुमचं नाव यादीत आहे की नाही, कसं ओळखाल?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील लाखो महिलांनी फॉर्म भरले आहेत, मात्र काहींना पैसे आले, तर काहींना आलेच नाहीत. तुमचं नाव या योजनेच्या यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी तुम्हाला खालील सिंपल स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:
- संकेतस्थळाला भेट द्या: सर्वात आधी तुम्हाला testmmmlby.mahaitgov.in या अधिकृत सांकेतिक स्थळावर (वेबसाइटवर) भेट द्यावी लागेल.
- पर्याय निवडा: या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला ‘Beneficiary Status’ (लाभार्थी स्थिती) चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक टाका: यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, जिथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) टाकावा लागेल.
- ओटीपी (OTP) प्रक्रिया: त्यानंतर कॅप्चा (Captcha) फिल करून ‘सबमिट’ करा. तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी (OTP) योग्य ठिकाणी टाकून तुम्ही तुमच्या नावाचा स्टेटस चेक करू शकता.
योजनांची यादी कशी पाहावी?
जर तुम्हाला संपूर्ण योजनांची यादी (List) पाहायची असेल, तर तुम्ही तुमच्या महानगर पालिकेच्या सांकेतिक स्थळावर जावे लागेल. तिथे जाऊन ‘माझी लाडकी बहीण योजना यादी’ यावर क्लिक करा. तुमचा प्रभाग (Ward) निवडून मग यादी डाउनलोड करून तुम्ही सविस्तर माहिती मिळवू शकता.
योजनेच्या संदर्भात कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी किंवा ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेसाठी संबंधित महानगरपालिकेच्या किंवा शासनाच्या अधिकृत माहितीवर लक्ष ठेवा.
तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे का, आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला आहे का?
व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा