Ladki Bahin Yojana E-KYC Documents: महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत महिलांना सध्या ₹१,५०० मिळतात. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने आपल्या घोषणापत्रामध्ये ही रक्कम वाढवून ₹२,१०० करण्याचे आश्वासन दिले होते. या वाढीव हप्त्याबद्दल राज्यातील महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत या विषयावर स्पष्टता दिली.
उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन
लाडक्या बहिणींचा हप्ता ₹२,१०० कधी मिळणार, या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्ही जे आश्वासन दिले आहे, ते आम्ही नक्कीच पूर्ण करू.”
- सध्याचा हप्ता: ₹१,५००.
- अपेक्षित हप्ता: ₹२,१०० (निवडणुकीत दिलेले आश्वासन).
- शिंदेंची भूमिका: त्यांनी हा हप्ता वाढवण्याचे आश्वासन नक्कीच पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट केले.
या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात लवकरच ₹२,१०० ची रक्कम जमा होईल, असे संकेत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, मात्र त्यांनी निश्चित तारीख मात्र सांगितली नाही.
एक वीस रुपये मिळण्यासाठी पुढील दोन कागदपत्रे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे
१) लडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थी महिला ह्या फक्त महाराष्ट्र राज्यातील महिला लाभार्थी असल्याकारणाने राज्याचे रहिवासी दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे
२) तसेच दुसरे महत्त्वाची कागदपत्र म्हणजे लाभार्थी पात्र महिलाचे नाव नोंदणी केलेले रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आवश्यक कागदपत्र मानले जात आहे याशिवाय महिलांना यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही
