Ladki Bahin Yojana E-KYC Check: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी e-KYC करणे अनिवार्य आहे. e-KYC प्रक्रिया कशी करायची आणि ती यशस्वीरित्या पूर्ण झाली की नाही, हे तपासण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे दिली आहे.
१. लाडकी बहीण योजना e-KYC करण्याची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया
योजनेच्या लाभार्थ्यांनी (लाडकी बहीण) खालीलप्रमाणे e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी:
पायरी १: अधिकृत संकेतस्थळाला भेट
- e-KYC करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जा:
ladkibahin.maharashtra.gov.in/eKYC
पायरी २: लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण
- तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
- ‘आधार प्रमाणीकरणासाठी संमती’ (मी सहमत आहे) निवडा.
- ‘OTP पाठवा’ बटणावर क्लिक करा.
- आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला सहा अंकी OTP टाकून ‘सबमिट करा’.
पायरी ३: पती/वडिलांचे आधार प्रमाणीकरण
- वडिलांचा किंवा पतीचा १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
- ‘आधार प्रमाणीकरणासाठी संमती’ (मी सहमत आहे) निवडून ‘OTP पाठवा’.
- आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला सहा अंकी OTP टाकून ‘सबमिट करा’.
पायरी ४: जात प्रवर्ग आणि कुटुंबाची माहिती
- पती/वडिलांचे नाव तपासा आणि तुमचा जात प्रवर्ग (उदा. सर्वसामान्य, इतर मागासवर्ग इ.) निवडा.
- कुटुंबाच्या उत्पन्नासंबंधी (नियमित कायम कर्मचारी/निवृत्ती वेतनधारक नाहीत) ‘होय’ हा पर्याय निवडा.
- ‘माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे’ यासाठी ‘होय’ निवडा.
- ‘माहिती खरी आहे’ याला टिक करा आणि ‘सबमिट करा’.
यशस्वी संदेश: हे सर्व झाल्यावर तुम्हाला स्क्रीनवर “तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली” असा मेसेज दिसेल.
२. e-KYC झाली आहे की नाही, हे कसे तपासावे?
e-KYC पूर्ण झाल्यावर तुम्हाला कोणताही वेगळा खात्रीचा मेसेज (SMS) येत नाही. त्यामुळे, तुमची प्रक्रिया खरोखर पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील सोपी पद्धत वापरा:
- पुन्हा संकेतस्थळावर जा: पुन्हा
ladkibahin.maharashtra.gov.in/eKYC
या लिंकवर भेट द्या. - लाभार्थीचा आधार क्रमांक भरा: लाभार्थी (लाडकी बहीण) महिलेचा १२ अंकी आधार क्रमांक, कॅप्चा आणि संमती निवडून ‘OTP पाठवा’ या बटणावर क्लिक करा.
- स्थिती तपासा:
- जर तुमची e-KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली असेल, तर तुम्हाला OTP येणार नाही, त्याऐवजी स्क्रीनवर एक सूचना (Warning) दिसेल: “या आधार क्रमांकाची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.”
- ही सूचना दिसणे म्हणजे तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, याची निश्चित खात्री होते.
