शेतकऱ्यांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटींच्या पॅकेजची घोषणा; कोणाला, किती मदत मिळणार? पहा सविस्तर Ativrushti Nuskan Bharpai Package

Ativrushti Nuskan Bharpai Package : या पॅकेजची घोषणा मंगळवारी (७ ऑक्टोबर २०२५) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या अंतर्गत ६८.६९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या २९ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यांमध्ये सरसकट मदत दिली जात आहे.

महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत 1,339 कोटींची मदत बँक खात्यावर जमा! येथे चेक करा Crop Insurance List
महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत 1,339 कोटींची मदत बँक खात्यावर जमा! येथे चेक करा Crop Insurance List

१. पूरग्रस्त नागरिकांना मिळणारी मदत (गैर-पीक नुकसान)

मदत प्रकारमदत रक्कम
मृतांच्या कुटुंबियांनाप्रत्येकी ₹४ लाख
जखमी व्यक्तींना₹७४,००० ते ₹२.५ लाख
घरगुती भांडी/वस्तूंचे नुकसान₹५,००० प्रति कुटुंब
कपडे/वस्तूंचे नुकसान₹५,००० प्रति कुटुंब
दुकानदार / टपरीधारकांना नुकसान भरपाई₹५०,०००
पडझड/नष्ट पक्क्या घरांसाठी (PM आवास योजना)₹१.२० लाख
पडझड/नष्ट कच्च्या घरांसाठी (डोंगरी भाग – PM आवास योजना)₹१.३० लाख
अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी₹६,५००
पडझड झालेल्या झोपड्यांसाठी₹८,०००
पडझड झालेल्या जनावरांच्या गोठ्यांसाठी₹३,०००
दुधाळ जनावरांसाठी (NDRF मर्यादा काढली)₹३७,५०० प्रति जनावर
ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी₹३२,००० प्रति जनावर
कुक्कुटपालनात (Poultry)₹१०० प्रति कोंबडी

२. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पीक आणि जमीन मदत

या पॅकेजमध्ये NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) निकषांप्रमाणे मदत + राज्य सरकारकडून अतिरिक्त मदत दिली जाणार आहे.

राज्यात वन विभागात तब्बल १२,९९१ जागांसाठी वनरक्षक भरती;पात्रता, अभ्यासक्रम संपूर्ण माहिती पहा Forest Department Recruitment
राज्यात वन विभागात तब्बल १२,९९१ जागांसाठी वनरक्षक भरती; पात्रता, अभ्यासक्रम संपूर्ण माहिती पहा Forest Department Recruitment
शेती/नुकसानीचा प्रकारNDRF प्रमाणे मदत (प्रति हेक्टर)राज्य सरकारची अतिरिक्त मदत (बियाणे/खतांसाठी)एकूण मदत (प्रति हेक्टर)
कोरडवाहू शेती (Dryland Farming)₹८,५००₹१०,०००₹१८,५००
हंगामी बागायत (Seasonal Irrigation)₹१७,०००₹१०,०००₹२७,०००
बागायती / बारमाही पिके (Perennial Crops)₹२२,५००₹१०,०००₹३२,५००

इतर शेती संबंधित मदत:

पीएम विश्वकर्मा योजनेत: १५,००० टूलकिट अनुदान आणि २ लाख रुपये मिळणार! येथे करा अर्ज PM Vishwakarma Yojana
पीएम विश्वकर्मा योजनेत: १५,००० रूपये टूलकिट अनुदान आणि २ लाख रुपये मिळणार! येथे करा अर्ज PM Vishwakarma Yojana
  • खरडून गेलेल्या जमिनीसाठी: प्रति हेक्टरी ₹३.५० लाख (यात ₹४७,००० रोख + ₹३ लाख नरेगाच्या (NREGA) माध्यमातून).
  • गाळाने बुजलेल्या विहिरींसाठी: ₹३०,००० मदत.

३. इतर महत्त्वपूर्ण घोषणा

  • पायाभूत सुविधा: ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी ₹१० हजार कोटी देणार.
  • निधी वापर: जिल्हा नियोजन निधीतून ५% (म्हणजे ₹१,५०० कोटी) पूरग्रस्त भागातील कामांसाठी वापरले जातील.
  • शैक्षणिक शुल्क माफी: दुष्काळ निकषांप्रमाणे शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ केली जाणार.
  • कर्ज सवलत: जमीन महसूलात सूट, कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जवसुलीसाठी स्थगिती दिली जाईल.
  • विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना:
    • कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ₹३५,००० प्रति हेक्टर.
    • बागायतदार शेतकऱ्यांसाठी ₹५०,००० प्रति हेक्टर.
  • रोजगार हमी योजना: कामाच्या निकषांमध्ये बदल केले जाणार.

        WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment