Ladki Bahin Yojana E-KYC Setp By Step Process: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महायुतीच्या महत्त्वपूर्ण योजनेतील बोगस लाभार्थींना वगळण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
नवीन नियम: पती/वडिलांची e-KYC आणि उत्पन्नाची पडताळणी बंधनकारक
योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारने आता खालील महत्त्वाचा नियम लागू केला आहे:
- नवीन नियम: लाभार्थी महिलेच्या सोबतच पती किंवा वडिलांची e-KYC (ई-केवायसी) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- उत्पन्नाची पडताळणी: लाभार्थी महिलेचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न किती आहे, याची राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे.
- अपात्रता निकष:
- जर महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे आणि लग्न झाले नसेल तर वडिलांचे उत्पन्न विचारात घेतले जाईल.
- लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास, संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.
कारणे: यापूर्वी केवळ लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासले होते, पण त्यात गृहिणी आणि बहुतांश महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर नव्हते. त्यामुळे आता कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana E-KYC Setp By Step Process
e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
लाभार्थी आणि त्यांच्या पती/वडिलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते:
- संकेतस्थळ: https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- आधार प्रमाणीकरण (लाभार्थी): e-KYC बॅनरवर क्लिक करून, लाभार्थ्याचा आधार क्रमांक आणि Captcha Code भरून Send OTP वर क्लिक करा आणि OTP टाकून Submit करा.
- पात्रता तपासणी: प्रणाली तुमच्या आधार क्रमांकाची पात्रता यादीत तपासणी करेल.
- पती/वडिलांचे प्रमाणीकरण: पात्र असल्यास, लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि Captcha Code नमूद करावा. OTP टाकून Submit करा.
- घोषणापत्र (Declaration): जात प्रवर्ग निवडून, कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नाहीत आणि कुटुंबातील केवळ १ विवाहित व १ अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, याचे प्रमाणपत्र द्यावे.
- अंतिम सबमिट: चेक बॉक्सवर क्लिक करून Submit बटण दाबावे.
- यशस्वी संदेश: ‘Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.
व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा