Panjabrao Dakh Hawaman Andaj List : राज्यात नैऋत्य मान्सून माघार घेत असल्याने पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी, हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे यांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. दिवाळीच्या आसपास १९ ते २२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पुन्हा पावसाचे सावट आहे.
सध्याच्या मान्सूनची स्थिती
- मान्सूनची माघार: नैऋत्य मान्सूनची माघार रेषा सध्या २० अंश उत्तर/६९ अंश पूर्व, वेरावल, भरुच, उज्जैन, झाशी, शाहजहांपूर आणि ३० अंश उत्तर/८१ पूर्व या भागातून जात आहे.
- अनुकूल परिस्थिती: पुढील ४-५ दिवसांत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांमधून मान्सूनच्या माघारीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.
- चक्रीवादळ: पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावरील तीव्र चक्रीवादळ ‘शक्ती’ कमकुवत झाले आहे.
८ ते १५ ऑक्टोबर दरम्यानचा हवामान अंदाज
हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे यांनी पुढील आठवड्यासाठी विभागानुसार खालीलप्रमाणे अंदाज दिला आहे:
विभाग | ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यानचा अंदाज |
विदर्भ | ८-९ ऑक्टोबर: पाऊस विखुरलेल्या स्वरूपात, धुई (धुके) चे प्रमाण वाढणार. १०-१५ ऑक्टोबर: पावसाची शक्यता खूप कमी भागात, फक्त दुपारनंतर स्थानिक वातावरणातच. रात्री गारवा जाणवेल. |
उत्तर महाराष्ट्र | ८-१० ऑक्टोबर: ‘शक्ती’ चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब अंशामुळे विरळ स्वरूपात पाऊस. १०-१५ ऑक्टोबर: पावसाची शक्यता फक्त दुपारनंतर स्थानिक वातावरणातच. रात्री गारवा जाणवेल. |
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा | ८-१५ ऑक्टोबर: विरळ स्वरूपात दुपारनंतर स्थानिक वातावरणात पाऊस, दिवसा भरपूर सूर्यप्रकाश. |
शेतकऱ्यांसाठी सल्ला
- काढणीची कामे: राज्यात आता पाऊस माघारी जात असल्याने, शेतकरी मित्रांनो ज्यांचे सोयाबीन, मका, कापूस काढणीला आले आहे, त्यांनी बिनधास्त काढून घेऊ शकता.
- दिवाळीचा इशारा: मात्र, दिवाळीदरम्यान १९ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पुन्हा पावसाचे सावट असल्यामुळे, शक्य असल्यास त्यापूर्वीच शेतीची कामे पूर्ण करून ठेवा.
