Panjabrao Dakh Hawaman Andaj :राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. १६ ऑक्टोबर २०२५ पासून महाराष्ट्राच्या वातावरणात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काही ठिकाणी पाऊस हजेरी लावू शकतो.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
- कामांची डेडलाईन: पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सोयाबीन काढणी आणि इतर सर्व शेतीची कामे आवरून घेण्याचा सल्ला दिला आहे.
पावसाचा अंदाज आणि स्वरूप
- सुरवात: १६ ऑक्टोबरला विदर्भातून पावसाला सुरुवात होईल.
- विस्तार: त्यानंतर हळूहळू हा पाऊस मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दाखल होईल.
- स्वरुप: हा पाऊस जोराचा नसेल. १६ आणि १७ ऑक्टोबर दरम्यान हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा राहील.
- ठिकाणे: पाऊस भाग बदलत तुरळक ठिकाणीच होईल आणि काही भाग कोरडाही राहू शकतो.
- घाबरू नका: पंजाब डख यांनी हा पाऊस मोठा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
