लाडकी बहीण योजना: सप्टेंबर चे १५०० रुपये मिळण्या अगोदर आणखी १ नवीन नियम लागू Ladki Bahin Yojana New Rule

विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतं मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) बोगस लाभार्थी हुडकून काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर मोहीम सुरु आहे. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड मोठा आर्थिक भार पडत असल्याने, आता राज्य सरकारने प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी करून लाखो बोगस लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यानंतर, राज्य सरकारने (Mahayuti Government) योजनेसाठी आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे, ज्यामुळे लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.

पती/वडिलांची e-KYC बंधनकारक आणि उत्पन्नाची पडताळणी

लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे.

या ५ राशींचे नशीब उजळणार, अचानक धनलाभ आणि अफाट पैसा येणार! ३ राशी पहा Gold Silver Rate
या ५ राशींचे नशीब उजळणार, अचानक धनलाभ आणि अफाट पैसा येणार! ३ राशी पहा Gold Silver Rate
  • नवीन नियम: या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची e-KYC (ई-केवायसी) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • उत्पन्नाची पडताळणी: लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थीसोबतच त्या महिलेचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न किती आहे, याची आता राज्य सरकारकडून पडताळणी केली जाणार आहे.
  • अपात्रता निकष: जर महिलेचे लग्नं झाले असेल तर पतीचे आणि लग्न झाले नसेल तर वडिलांचे उत्पन्न शोधले जाईल. लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.

याआधी लाभार्थी महिलांचे उत्पन्न शोधले गेले होते, पण त्यात गृहिणी आणि बहुतांश महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर नसल्याचे आढळून आले होते. त्यामुळे आता राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई-केवायसी बंधनकारक केले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी:

बाबा वेंगा भविष्यवाणी २०२५: पुढील ६ महिन्यांत ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभ; करोडपती होण्याची शक्यता Gold Price
बाबा वेंगा भविष्यवाणी २०२५: पुढील ६ महिन्यांत ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभ; करोडपती… Crop Insurance List
  1. संकेतस्थळ: https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  2. आधार प्रमाणीकरण (लाभार्थी): मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक करून फॉर्म उघडा. लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP वर क्लिक करावे. आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
  3. पात्रता तपासणी: प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
  4. पती/वडिलांचे प्रमाणीकरण: यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच कॅप्चा कोड नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
  5. घोषणापत्र (Declaration): लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
    • कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
    • माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
  6. अंतिम सबमिट: वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
  7. यशस्वी संदेश: शेवटी, ‘Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.

        WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment